राष्ट्रीय संस्थेचा अहवाल प्रसिध्द झालेला नसताना बेरोजगारीचे आकडे आले कुठुन ...? व्ही. के. सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 07:47 PM2019-02-13T19:47:37+5:302019-02-13T19:48:31+5:30
भाजपा सत्तेवर आल्यापासून काश्मीर प्रश्न चिघळला आहे, असे वारंवार सांगण्यात येते, त्यात तथ्य नाही.
पुणे : सत्ताधारी भाजपासरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होणार होते, त्याचे काय झाले अशी विचारणा केली जाते. मात्र, त्याचा अर्थ नीट समजावून घेतला गेलेला नाही. मागील ५ वर्षात डाळ, तांदूळ अशा धान्याच्या दरात काहीही वाढ नाही, विदेशात वेगवेगळ्या कारणांनी अडकून पडलेल्या २ लाख लोकांची सुटका, पासपोर्ट त्वरीत मिळणे, देशातील अनेक रस्त्यांची उत्तमप्रकारे पूर्णत: , त्यामुळे व्यवसाय वाढले. परंतु, विरोधकांकडून बेरोजगारीचे आकडे ज्या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालाचा दाखला देत सांगितले जाते तो अहवालच अद्याप प्रसिद्ध झालेला नाही, तरीही टीका केली जात आहे, असे टीकास्त्र माजी लष्करप्रमुख व परराज्य व्यवहार मंत्री व्ही. के. सिंग यांनी विरोधकांवर सोडले.
सिंग हे पुण्यात येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिंग म्हणाले, काश्मीरमध्ये आपण सलग ७ वर्षे काम केले आहे. पण भाजपा सत्तेवर आल्यापासून हा प्रश्न चिघळला आहे असे वारंवार सांगण्यात येते, त्यात तथ्य नाही. तिथे काही समस्या आहेत, त्या अत्यंत जुन्या आहेत, त्या सोडवण्याचा राजकीय प्रयत्न करणे गरजेचे आहे व तो होत आहे. भारताची विदेशनिती ही भारताचे हित कशात आहे त्यावर अवलंबून असते, इतर देशांचे परस्परांशी कसे संबध आहेत त्यावर नाही. मोदी यांनी शपथविधी कार्यक्रमाला अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते. पाकिस्तानही त्यात होता. त्यावर सिद्ध होते की आम्हाला त्यांच्याबरोबर चांगले संबध ठेवायचे आहेत, मात्र बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होऊ शकत नाही, त्यामुळे वातावरण चांगले ठेवणे पाकिस्तानच्या हातात आहे व ते चांगले होत नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही.
---------------------------------
सैन्यदलासाठीच्या शस्त्र खरेदीत निविदा प्रसिद्ध करण्यापर्यंत येण्यासाठीच अनेक चाचण्या आहेत. निविदा प्राप्त झाल्यानंतरही नेहमीप्रमाणे कमी किंमतीच्या निविदेला पसंती असे करता येत नाही. कमी किमतीच्या निविदेत नमुद केलेला शस्त्रे तांत्रिकदृष्ट्या परिपुर्ण असतीलच असे नाही. राफेलच काय, प्रत्येक शस्त्रखरेदीच्या वेळी असा विचार करावाच लागतो.
व्ही. के. सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री