कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 05:54 AM2015-05-11T05:54:24+5:302015-05-11T05:54:24+5:30

भोर तालुक्याने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांची भरभराट पाहिली आहे. त्याचा फायदाही या परिसराला झाला.

Unemployment is unemployed | कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की

कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की

Next

भोर : भोर तालुक्याने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांची भरभराट पाहिली आहे. त्याचा फायदाही या परिसराला झाला. मात्र, तालुक्याचे वैभव असलेले हे उद्योग अलीकडच्या काळात एकामागून एक बंद पडले. त्यामुळे शेकडो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भोर हे संस्थानकाळापासून भाटघर धरणामुळे अग्रेसर होते. त्यानंतर ठाकरसी ग्रुपने फोम लेदरमध्ये मजल मारून मार्केट मिळवले तसेच आरलॅब्ज कंपनीने रंग तयार करून रशियाची बाजारपेठ मिळवली
आणि भोरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या शिवाय स्टील गु्रप, यशवंत सूत गिरणी अशा प्रकारचे उद्योग सुरु होते. सुमारे साडेतीन हजार कामगार आपली शेती करून नोकरी करीत होते. भोर नगरपलिकेने ३७ एकरांत छोट्या उद्योगांसाठी औद्योगिक वसाहत उभारली होती, तीही बंद पडली आहे.
भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असल्याने जिरायती
शेती आणि तेही फक्त भात
पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ
येत असल्याने शाळा शिकायची
सोडून कुटुंबाला हातभार लावण्यास १०वी नंतर मुले कामधंद्यासाठी पुणे-मुंबईला जाऊन हमाली करतात किंवा दुकानात काम करून उदरनिर्वह भागवून उरलेले पैसे घरी पाठवतात.
(वार्ताहर)

विकासकामांकडे दुर्लक्ष
४पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांपैकी पुरंदर तालुक्यामधील सासवडचा झपाट्याने विकास झाला. दौंड, बारामती, इंदापूर, मुळशी, मावळ, खेड या तालुक्यांचा विकास झाला. मात्र, पुणे शहरापासून भोर अवघ्या ५० किलोमीटरवर असूनही भोर, वेल्हे या तालुक्यांचा विकास झाला नाही. पूर्वेकडील तालुक्यांना पाणी देण्याची जबाबदारी या दोन्ही तालुक्यांनी घेऊनही कोणतीच अपेक्षा ठेवली नाही.
औद्योगिक वसाहती सुरूकरणे गरजेचे
४भोर तालुक्यात राजकीय पक्षांकडून औद्योगिक वसाहती सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे; मात्र प्रत्यक्षात होत नाही. ती खरोखरच पूर्ण झाल्यास पर्यटनाचा विकास झाल्यास भोर तालुक्यातील बेरोजगारी कमी होऊन तालुक्याचा विकास होणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी निवडणुका आल्यावर भांडवल करण्याऐवजी प्रत्यक्षात पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे, तरच ते शक्य आहे.

Web Title: Unemployment is unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.