आठवणीतून उलगडले अनोखे पुणे

By admin | Published: April 24, 2017 05:13 AM2017-04-24T05:13:08+5:302017-04-24T05:13:08+5:30

कसब्यापुरते मर्यादित असलेल्या पुण्याचा पुनवडी ते माहिती तंत्रज्ञानाचं एक प्रमुख केंद्र म्हणून होत असलेल्या वाटचालीचा इतिहास

Unexpected Pune unveiled from memories | आठवणीतून उलगडले अनोखे पुणे

आठवणीतून उलगडले अनोखे पुणे

Next

पुणे : कसब्यापुरते मर्यादित असलेल्या पुण्याचा पुनवडी ते माहिती तंत्रज्ञानाचं एक प्रमुख केंद्र म्हणून होत असलेल्या वाटचालीचा इतिहास ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी उलगडून सांगताना सभागृह पुण्याच्या आठवणींमध्ये हरवून गेले होते.
निमित्त होते ‘हरवलेले पुणे’ या डॉ. अविनाश सोवनी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे. रविवारी झालेल्या या सोहळ्यास भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस डॉ. श्री. मा. भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस मंचावर उपस्थित होत्या.
मनोगतात पुण्याच्या इतिहासाच्या आठवणी सांगताना बलकवडे यांनी उपस्थितांना त्या काळात नेऊन ठेवले. पुणे शहराचा एक छोटसं गाव ते महानगरापर्यंतच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला. मनोगतात ते म्हणाले, ‘‘१८६५ मध्ये ना. वि. जोशी यांनी पुण्याच्या इतिहासावर लेखन करत ‘पुनवडी ते पुणे’ ही संकल्पना मांडली. शिवरायांच्या पुण्यातील आगमनाने पुणे हे भारताचे केंद्रबिंदू झाले. आठव्या व नवव्या शतकात प्रशासकीय शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख यादवांच्या काळात धार्मिक अशी झाली. या शहरावर गाढवाचा नांगर फिरला असून हे शहर वास्तव्यास योग्य नाही अशा पसरवल्या गेलेल्या समजाला जिजाऊंनी शिवाजीमहाराजांना घेऊन पुण्यात वास्तव्य केल्याने खऱ्या अर्थाने तडा गेला.’’
डॉ. श्री. मा. भावे यांनी लहानपणापासूनच्या पुण्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. पुणे हे हिरवळीचं शहर होतं मात्र ही ओळख आता हळूहळू आपण पुसत असून आता सिमेंटचं पुणे अशी नवी ओळख आपण तयार करत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुण्याला गॉर्डन सिटी आॅफ डेक्कन असे इंग्रजांनी संबोधले होते असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Unexpected Pune unveiled from memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.