‘अनफिट’ बस तपासणीला डॉक्टरच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:33 AM2019-01-22T02:33:41+5:302019-01-22T02:33:45+5:30
शहरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ‘अनफिट’ बसची तपासणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी दिले आहेत.
पुणे : शहरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ‘अनफिट’ बसची तपासणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी दिले आहेत. पण प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीओकडे तपासणीसाठी आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध होत नसल्याने बस तपासणी होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर आरटीओतील अधिकाºयाने बसची तपासणी करून अनफिट ठरविले. पण ही एकच बस अनफिट नसून दररोज शेकडो बस तांत्रिक त्रुटी असूनही मार्गावर
धावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरटीओने मार्गावरील सर्वच बसची तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. याबाबत काही प्रवाशांनी आरटीओकडे ई-मेलद्वारे तक्रारीही केल्या आहेत. तसेच प्रवाशांची मागणी विचारात घेऊन आरटीओकडून संबंधित अधिकाºयांना तपासणीचे आदेशही दिले आहेत. पण प्रत्यक्षात ही तपासणी कोण करणार, ही चिंता अधिकाºयांना सतावत आहे.
आरटीओमध्ये सध्या मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामे करणेही शक्य होत नाही. त्यामुळे स्वतंत्र पथके नेमून बस तपासणी करणे शक्य होत नाही. असे केल्यास इतर कामांवर
विपरीत परिणाम होतो, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पीएमपी प्रशासन जुन्या बसकडे बोट दाखवत आहे.
दोन्ही यंत्रणांच्या हतबलतेमुळे मात्र प्रवासी बेजार झाले आहेत. खिळखिळ््या बसमधूनच त्यांना
प्रवास करावा लागत आहे. दररोज तक्रारी करूनही स्थिती सुधारत नाही. हा प्रशासनाची अंतर्गत बाब
असून त्यात प्रवासी भरडले
जात असल्याची नाराजी पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी व्यक्त केली.