Pune | सासवडमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:08 PM2023-04-05T20:08:16+5:302023-04-05T20:08:52+5:30

सर्व कुटुंबीय नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले असता फोन आला म्हणून गडबडीत खाली येत असताना ही दुर्दैवी घटना घडली...

Unfortunate death of a young woman after falling from the fifth floor of a building in Saswad | Pune | सासवडमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Pune | सासवडमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

सासवड (पुणे) : सासवड शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनीलनाना जगताप यांची कन्या अनुष्का जगताप (वय २१) हिचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दिनांक २ एप्रिल रोजी त्यांच्या उत्तम सोसायटीच्या मागील जागेत स्वतःच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडली.

अपघातानंतर पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल केले असता दि. ४ (मंगळवार) रोजी तिचे निधन झाले. सर्व कुटुंबीय नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले असता फोन आला म्हणून गडबडीत खाली येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बीएसस्सी पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी येथे दुःखाची छाया पसरली आहे. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का पुतणी होती.

Web Title: Unfortunate death of a young woman after falling from the fifth floor of a building in Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.