चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:58 PM2018-04-07T12:58:52+5:302018-04-07T12:58:52+5:30

चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून पती- पत्नी दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले.

unfortunate death of women due to fall down in canal | चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

Next
ठळक मुद्देरस्ता नसल्याने रोज अडचणीचा सामना करत नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरु

खेड : रेटवडी येथे चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दुचाकीसह पती- पत्नी पाण्यात पडून पत्नीचा बुडून दुर्दैवी मुत्यू झाला. पतीने पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला. उज्वला राजेंद्र भगत (वय ३७, सध्या रा. राजगुरुनगर, मुळ गाव निमगाव खंडोबा ता. खेड ) असे मृत्यूमुखी पड़लेल्या महिलेचे नाव  आहे.
  याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ६ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भगत दांपत्य हे  चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. पती राजेंद्र यांने पत्नी उज्वला हिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यांचा प्रवाह जास्त असल्याने पती- पत्नी पाण्यात वाहून गेली. राजेंद्र भगत यांनी आरओरडा केला.त्यामुळे रेटवडी येथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धाऊन आले. नागरिकांच्या मदतीने राजेंद्र भगत यांना वाचविण्यात यश आले. परंतू, पाण्याच्या प्रवाहात त्यांच्या पत्नी वाहत गेल्याने दुर्दैवी अंत झाला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून अनेक दिवसांपासुन पाण्याचा विसर्ग सुरु असुन कालवा दुथडी भरुन वाहत आहे. चासकमानच्या डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजुने दळणवळणासाठी रस्ता आहे. या रस्त्यांचा वापर आजुबाजुच्या गावातील शेतकरी करत असतात. भगतवस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अशा अडचणीचा सामना करत येथील नागरिकांचा रोज जीवघेणा प्रवास सुरु असतो. या घटनेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्यामुळे भगतवस्ती रेटवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


 

Web Title: unfortunate death of women due to fall down in canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.