पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:06 PM2019-06-29T12:06:18+5:302019-06-29T12:07:45+5:30

पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने रागानेत्याच्या त्याच्या दुचाकीची चोरी केली.

The unfortunate incident in Pune ... wife theft of husband's car | पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी केली पत्नीकडून ती दुचाकी जप्त

पुणे : पहिल्या पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नीने दुसरे लग्न केले. पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने रागाने पतीच्य्या दुचाकीची चोरी केली. त्यानंतर पोलिसांनी पकडू नये याकरिता त्या दुचाकीचा क्रमांक बदलला. पोलिसांनी तपास केला असता त्यांनी याप्रकरणी पत्नीकडून ती दुचाकी जप्त केली आहे. याबाबत  हरिषकुमार बोधवानी (वय 39,रा.विक्रांत कॉम्प्लेक्स, पिंंपरी) यांनी 2018 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 
 याप्रकरणी संशयित आरोपी अमित कागडा व त्यांची पत्नी दिशा कागडा (रा.बौध्दनगर, रिव्हर रोड पिंंपरी) यांच्याकडून दुचाकी जप्त केली आहे. तसेच त्यांचा पुढील तपास पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पांढ-या रंगाची सुझुकी मोपेड (एम एच 12, व्ही एस 5841) दुचाकी बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्याने जाताना दिसली. यावेळी पोलीस नाईक अतुल साठे यांना त्या दुचाकीचा क्रमांकाबाबत संशय आल्याने त्यांनी या दुचाकीवरील व्यक्तींना थांबवले. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रांविषयी विचारले असता त्यांनी कागदपत्रे जवळ नसल्याचे सांगितले. यावरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन स्टोलन व्हेईकल अँपव्दारे माहिती घेतल्यानंतर संबंधित वाहनाचा मुळ नंबर एम एच जीपी 2928 असल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपींकडे अधिक तपास केल्यानंतर महिलेने पहिले पती मारहाण करुन त्रास द्यायचे. त्यांच्या त्रासाला कंटाळुन त्या दोन वर्षांपूर्वी अमित यांच्याशी विवाह केला. पहिल्या पतीशी भांडण  झाल्यानंतर आपण गाडी घेऊन आल्याचे पत्नीने सांगितले. तसेच पोलिसांनी आपल्याला पकडू नये याकरिता गाडीचा क्रमांक बदलल्याची क बुली दिली. 
 ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 1 चे समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र  मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी दत्तात्रय गरुड, संतोष क्षिरसागर, यांच्या पथकाने केली. 

Web Title: The unfortunate incident in Pune ... wife theft of husband's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.