दुर्दैवी! बेड उपलब्ध न झाल्याने घरातच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 06:10 PM2021-04-11T18:10:19+5:302021-04-11T18:11:05+5:30

आंबेडकर वसाहतीतील घटना

Unfortunately! He took his last breath at home as the bed was not available | दुर्दैवी! बेड उपलब्ध न झाल्याने घरातच घेतला अखेरचा श्वास

दुर्दैवी! बेड उपलब्ध न झाल्याने घरातच घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेच्या हेल्पलाइनही मदत करण्यास ठरल्या असमर्थ

पाषाण: औंध मधील आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीचा बेड उपलब्ध न झाल्याने घरातच मृत्यू झाला आहे. संतोष ठोसर असे त्यांचे नाव असून मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण परिवार आणि वसाहतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

गेल्या काही दिवसापासून संतोष हे कोरोना संक्रमित होते. दोन दिवस यांच्या घरच्यांनी महापालिकेने दिलेल्या सर्व नंबर वर कॉल केले. पण हे नंबर सारखेच व्यस्त लागत होते. कोणीही याची दखल घेत नसल्याचे दिसून आले. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यामुळे शास्वत हॉस्पिटल व मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळच्या रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न केले. परंतु दोन्ही हॉस्पिटलने कोव्हिड रुग्ण असल्यामुळे दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर औंध - बोपोडी - बाणेर परिसरातील हॉस्पिटलमध्ये बेडबाबत चौकशी केली. पण एकही बेड शिल्लक नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात येत होते. शेवटी एकही बेड शिल्लक नसल्याने  संतोष ठोसर यांनी घरातच अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला ,ही निधन वार्ता ऐकताच ड़ॉ आंबेडकर वसाहती मध्ये शोककळा पसरली होती. नागरिकांना बेड मिळत तसेच पालिकेच्या हेल्पलाईन देखील नागरिकांची मदत करण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्येने तर एका पाच हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. तर ५० हजारांच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. सर्वत्र रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

Web Title: Unfortunately! He took his last breath at home as the bed was not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.