उलगडली परंपरा नाट्यसंगीताची

By admin | Published: December 31, 2014 12:27 AM2014-12-31T00:27:16+5:302014-12-31T00:27:16+5:30

‘नाही मी बोलत..’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘खरा तो प्रेमा..’, ‘परवशता पाश दैवे... ’, ‘नाथ हा माझा’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘कशी केली माझी दैना’

Unglacious Tradition NatyaSangeetachi | उलगडली परंपरा नाट्यसंगीताची

उलगडली परंपरा नाट्यसंगीताची

Next

पुणे : ‘नाही मी बोलत..’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘खरा तो प्रेमा..’, ‘परवशता पाश दैवे... ’, ‘नाथ हा माझा’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘कशी केली माझी दैना’ अशा अवीट गोडीच्या नाट्यगीतांच्या सादरीकरणाचा ‘सौंदर्य नाट्यसंगीताचे’ या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘गाववर्धन’ संस्था व श्रीमती नलिनी छगन सुरा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या गेल्या शंभर वर्षातील दर्जेदार व लोकप्रिय अशी नाट्यगीते कविता टिकेकर, हृषीकेश बडवे, कल्याणी पोतदार-जोशी यांनी सादर केली. नटी-सूत्रधार अशा पारंपरिक वेषामधून झालेले नांदी ते भरतवाक्यापर्यंतच्या विविध नाट्यपदांच्या सादरीकरणाने बहार आणला. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. जयराम पोतदार यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमाचे निवेदन अभय जबडे यांनी केले. आजही नाट्यसंगीताची लोकप्रियता टिकून आहे. याचा प्रत्यय उपस्थित रसिकांनी घेतला. आॅर्गनवर पं. जयराम पोतदार तर तबला मोहन पारसनीस यांनी साथ केली. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. सुधा पटवर्धन यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी गानवर्धनचे कृ.गो. धर्माधिकारी, लता साठे, मदन सुरा, डॉ. विवेक सुरा, माधुरी सत्यनारायण, दयानंद घोटकर आदी उपस्थित होते.

गायन स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरण
४कार्यक्रमात गानवर्धन संस्थेने वय वर्ष १८ ते ३० वयोगटातील युवा कलाकारांसाठी आयोजित केलेल्या शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले.
४ यात ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार मुंबई येथील आदित्य मोडक याला तर पं. शरद सुतवणे स्मृती पुरस्कार धारवाड येथील शिवानी मिरजकर हिला देण्यात आला. तसेच ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता कै. रोहिणी भाटे पुरस्कृत उषा मुजुमदार स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार पुण्यातील अर्पिता वैशंपायन हिला देण्यात आला.
४तर अन्य पुरस्कारांमध्ये शमिका भिडे, पुणे (पं. त्र्यंबकराव जानोरीकर शास्त्रीय गायन), दीपिका भिडे, ठाणे (गायिका नूपुर काशिद ), स्वरांगी मराठे, ठाणे (प्रतिभा परांजपे शास्त्रीय गायन), शलाका रेडकर, मुंबई (पं. रामराव कोरटकर स्मृती) व राधिका जोशी-राय, बंगळुरू(दत्तात्रय रत्नपारखी स्मृती) यांनाही पुरस्कार देण्यात आले.

Web Title: Unglacious Tradition NatyaSangeetachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.