अनोळखी तरुणाचा मृतदेह

By admin | Published: December 23, 2016 12:58 AM2016-12-23T00:58:12+5:302016-12-23T00:58:12+5:30

सासवड रस्त्यावर ग्लायडिंग सेंटरच्या आवारात २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अर्धवट जळालेल्या

Unidentified youth's body | अनोळखी तरुणाचा मृतदेह

अनोळखी तरुणाचा मृतदेह

Next

हडपसर : सासवड रस्त्यावर ग्लायडिंग सेंटरच्या आवारात २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नाही. ही आत्महत्या आहे की खून, याबाबत हडपसर पोलीस तपास करीत आहेत.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लायडिंग सेंटरच्या आवारात दुपारी दोनच्या सुमारास एक व्यक्ती जळालेल्या अवस्थेत पडलेली आहे, अशी माहिती एका नागरिकाने दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचले असता सेंटरच्या खाणीच्या शेजारी पुरुष जातीचा जळालेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह मिळून आला. अंगावरील कपडे जळाले होते. त्याच्या अंगावरील जळून शिल्लक राहिलेल्या हिरव्या रंगाच्या नायलॉनच्या फोल्ड केलेल्या पॅन्टचा काही भाग मिळून आला. मृतदेहाच्या शेजारी क्रीम रंगाची सॅण्डल सापडली. तिथे माचीस काडीची डबीही मिळून आली.

Web Title: Unidentified youth's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.