जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:17+5:302020-12-11T04:28:17+5:30
पुणे: शिक्षा अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे १ लाख ५९ हजार ४०३ विद्यार्थी गणेवेशाचे वाटप केले ...
पुणे: शिक्षा अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे १ लाख ५९ हजार ४०३ विद्यार्थी गणेवेशाचे वाटप केले जाणार असून त्यासाठी शासनाने ४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना दोन ऐवजी एकच गणवेश दिला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील शाळा तब्बल आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या. शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर दोन गणवेश दिले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे दोन ऐवजी एकच गणवेश दिला जाणार आहे. शहरी भागातील शाळा बंद असल्या तरी ग्रामीण भागातील शाळा सुरळीतपणे सुरू झाल्या असून गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आता या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाणार आहे.
----------------------------------------
जिल्हा परिषदेला निधी ४ कोटींचा निधी
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेशाचे वाटप केले जाते. त्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जातो. यंदा शासनाने ४ कोटी ७८ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. पुढील काही दिवसात मंजूर झालेला निधी प्राप्त होणार आहे.
----------------------
जिल्हा परिषदेकडून प्रत्येक विद्यार्थ्याचा गणवेश खरेदी केला जात नाही तर शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वाटप थेट शाळांना केले जाते. शाळेकडून गणवेश देण्याबाबतची कार्यवाही केली जाते. कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला जाणार असल्याने शाळांचा गणवेश वितरणाचा भार काहीसा कमी होणार आहे.
--------------------------
जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतचे १ लाख ५९ हजार ४०३ मुले-मुली गणवेशाचे लाभार्थी
जिल्हा परिषदेच्या निधीतून सुमारे ६९ हजार मुलांना स्वतंत्रपणे गणवेशाचे वितरण
मागील वर्षी दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
--------------
राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जाते. त्यानुसार या वर्षी सुध्दा विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाईल. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना दोन ऐवजी एकच गणवेश देण्यात येईल.
- सुनील कु-हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
-------------------