केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 10:34 AM2022-09-23T10:34:26+5:302022-09-23T10:34:54+5:30

पुजारी वर्गाकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले

Union Finance Minister Nirmala Sitharaman visited jejuri khandoba temple | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

Next

जेजुरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी साडे नऊ वाजता जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे जेजुरी गडावर आगमन झाले. 

त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, दौडचे आ राहुल कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, संगीताराजे जाधवराव निंबाळकर,  सचिन पेशवे, आ.माधुरी मिसाळ, आ. बाळा भेगडे त्याचबरोबर स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

खंडोबाचे दर्शन घेऊन त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही उरकले. गडकोटातील बालदारीत झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांचे मार्तंड देवसंस्थान, पुजारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. पुजारी वर्गाकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Union Finance Minister Nirmala Sitharaman visited jejuri khandoba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.