केंद्रीय मंत्री राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधी वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:16+5:302021-08-25T04:14:16+5:30

शिवसेना संपर्क जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी बाळासाहेब शिंदे, पप्पू माने, ...

Union Minister Rane's statement against the Chief Minister had a severe repercussion in Baramati | केंद्रीय मंत्री राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधी वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद

केंद्रीय मंत्री राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधी वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद

Next

शिवसेना संपर्क जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी बाळासाहेब शिंदे, पप्पू माने, निखिल देवकाते, विश्वास मांढरे, रमेश खलाटे, शौकत बागवान आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हातात कोंबड्या घेत आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी उद्धवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आवाज कोणाचा, आवाज शिवसेनेचा, शिवसेना झिंदाबाद, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है तसेच नारायण राणे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

या वेळी बोलताना अॅड. काळे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न जाणूनबुजून निर्माण करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनजीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. नुकतेच नाशिक येथील कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रती एकेरी भाषा वापरून मुख्यमंत्री व संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अॅड. काळे यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत निषेध नोंदविला.

२४०८२०२१ बारामती—१७

बातमी फोटोसह सविस्तर आवश्यक

Web Title: Union Minister Rane's statement against the Chief Minister had a severe repercussion in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.