‘जनसेवा फाउंडेशन’चा केंद्रीय मंत्र्यांकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:34+5:302021-01-20T04:12:34+5:30
पुणे : जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार राजेश शहा यांना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खासदार गिरीश ...
पुणे : जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार राजेश शहा यांना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक आदी यावेळी उपस्थित होते.
जनसेवा फाउंडेशन रस्त्यावरील मुलांसाठी (स्ट्रीट चिल्ड्रेन) राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. कात्रज येथे या मुलांना राहण्यासाठी वसतिगृह बांधले आहे. शहरातील विविध शाळांमध्ये या मुलांना पाठविले जाते.
मुलांमधून भावी कुशल व गुणवंत खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने काही मुलांना ‘खेलो इंडिया’ या मोहिमे अंतर्गत ‘इंडिया खेलेगा’ या उपक्रमात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल जनसेवा फाउंडेशनला स. प. महाविद्यालयाच्या रमाबाई हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.