आंदर मावळातील लालवाडीच्या आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा, एकदा हा जबरदस्त Video पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 11:56 PM2021-05-20T23:56:09+5:302021-05-20T23:56:53+5:30
ग्रामीण बोलीभाषेत रानच्या पाखराला जीव लावला तर तेही जवळ येते अशी म्हण आहे. ही म्हण आंदर मावळातील लालवाडी (डाहुली) येथील ६० वर्षीय आजींनी खरी करून दाखवली आहे.
चंद्रकांत लोळे
ग्रामीण बोलीभाषेत रानच्या पाखराला जीव लावला तर तेही जवळ येते अशी म्हण आहे. ही म्हण आंदर मावळातील लालवाडी (डाहुली) येथील ६० वर्षीय आजींनी खरी करून दाखवली आहे. या आजींचं चक्क एका मोरासोबत मैत्रीचं नात असुन त्या त्याच्यासोबत खेळतात, गप्पा देखील मारतात. त्यांची ही अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा आहे.
सुगंधा चिंधु पिंगळे वय ६०, लालवाडी यांना मागील २ वर्षापूर्वी एक मोराचे पिल्लू करवंदाच्या जाळीत अडकल्याने जखमी झालेले सापडले. त्याच्या उजव्या पंखाला व पायाला गंभीर जखम झाली होती. त्याला बिबवा तसेच औषध लावुन त्याला कोंबडीसोबत वाढविले. जखम नीट झाल्यावर त्याला अनेक वेळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सोडून दिले.
VIDEO: आंदर मावळातील लालवाडीच्या आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा pic.twitter.com/bdcvbSvHJT
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2021
पण म्हणतात ना पशु, प्राणी केलेली मदत, लावलेला जिव्हाळा कधीच विसरत नाही. त्याचप्रमाणे हा मोर देखील मैत्रीच नात जपत वनक्षेत्रातुन आजीला भेटायला येतोच आजी त्याला खायला देतात. तो वनक्षेत्राच्या हद्दीत फिरुन पुन्हा घराच्या परिसरातील आंब्याच्या झाडावर बसतो. एकंदर या मोर आजीच्या कुटुंबातील सदस्य झाला आहे. घराच्या परिसरात अजगर व साप दिसताच ओरडून त्यांना वापस पाठवतो.
आजीला शेतात जाताना सोबत देतो.
आजीच्या आणि मोराच्या मैत्रीची चांगलीच चर्चा असल्याने आंदर मावळात पर्यटन करण्यासाठी आलेल्या पर्यटक देखील त्यांना भेटल्याशिवाय परत जात नाही. यावेळी आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीचा फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही. हा मोर अनोळखी व्यक्ती आल्यावर ओरडतो. घरातील लहानथोरांसोबत प्रेमाने वागतो.
यावेळी आजी सुगंधा पिंगळे म्हणाल्या लालवाडी हद्दीलगत वनक्षेत्र असुन अनेक वन्यजीव उन्हाळ्यात अन्न व पाण्याच्या शोधार्थ येतात त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवते. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. डाहुली लालवाडी येथील या आजींचे वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाचे विचार सर्वांसाठीच आदर्श उदाहरण आहे.