आठवणींचे अनोखे कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:08 AM2021-06-02T04:08:58+5:302021-06-02T04:08:58+5:30
स्वाती सामक आणि प्रभा सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संमेलनासाठी अनेक कवी उपस्थित होते. मैथिली आडकर यांनी संयोजन ...
स्वाती सामक आणि प्रभा सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संमेलनासाठी अनेक कवी उपस्थित होते. मैथिली आडकर यांनी संयोजन केले, तर शिल्पा देशपांडे यांनी समन्वय साधला, कामिनी केंभावी यांनी चित्रफितीच्या माध्यमातून संमेलन रसिकांपर्यंत पोहोचवले.
'आठवतात का तुला ते सुगंधी... प्रतिभा पवार यांच्या काव्याने तसेच प्रतिमा कुलकर्णी यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहावे पुन्हा पुन्हा... आणि प्रणिता कुलकर्णी यांनी तुझ्या प्रीतीचे मज भवताली,आठवणींचे पिसे असे... अशा प्रेमकवितांनी रसिकांची मने जिंकली. स्वाती सामक यांच्या आठवणी, इथून तिथून पेरलेल्या, आठवणी, इथून तिथून उगवलेल्या आणि अनिल रत्नाकर यांच्या 'माझ्या आईच्या घरात, माझ्या फक्त आठवणी होत्या. अस्तित्व हरवलेल्या...' अशा कवितांनी भावुक केले. या वेळी ज्योती सरदेसाई, मीनाक्षी नवले, अंजली देसाई, चंद्रकांत ठाकरे आदी कवींनी रचना सादर केल्या.