वाहतूक पोलिसांचे अनोखे रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:31 AM2017-08-08T03:31:46+5:302017-08-08T03:31:46+5:30
‘बहीण जशी भावाला राखी बांधून भावाकडून रक्षणाची अपेक्षा करते. तसेच आम्ही आपणास राखी बांधून वाहतूक नियमांचे रक्षण करण्याची अपेक्षा करतो.’ अशा आशयाची भेटपत्रे आणि राख्या घेऊन वाहतूक पोलिसांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘बहीण जशी भावाला राखी बांधून भावाकडून रक्षणाची अपेक्षा करते. तसेच आम्ही आपणास राखी बांधून वाहतूक नियमांचे रक्षण करण्याची अपेक्षा करतो.’ अशा आशयाची भेटपत्रे आणि राख्या घेऊन वाहतूक पोलिसांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या वेळी वाहनचालकांना स्वयंसेवी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या तसेच महिला पोलिसांनी वाहनचालकांना राख्या बांधून रस्ता सुरक्षेचे आवाहन केले.
वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी वाहनचालकांचे प्रबोधन करुन अपघातमुक्तीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या
आहेत.
सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे आणि त्यांच्या पथकानेही जनजागृती मोहीम घेतली. या वेळी ५ हजार ग्रीटिंग आणि ५ हजार राख्या वर्गणी काढून विकत घेतल्या. बा. रा. घोलप विद्यालय, मनपा शाळा, पिंपळे निलख येथील विद्यार्थी व शिक्षकांसह रक्षक चौक, वाकड वाय जंक्शन चौक, तापकीर चौक, व शिवार चौकात जनजागृती घेण्यात आली.
अनेक वाहनचालकांनी पोलिसांसोबत राखी बांधून घेताना सेल्फी घेतले. या उपक्रमाला उपायुक्त अशोक मोराळे, सहायक
आयुक्त राजेंद्र भामरे यांनी
उपस्थित राहून पोलिसांचा हुरुप वाढवला.
शुभेच्छापत्रकांचे वाटप
रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाहनचालकांना राख्या बांधून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याची संकल्पना आयुक्त शुक्ला यांनी मांडली. त्यानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील प्रमुख चौकांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारी शुभेच्छापत्रेही या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी वाटली.
रक्षाबंधन साजरे
पुणे: पुणे रॉयल ग्रुप व लीलाबाई कपूरचंदजी राठोड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त शहरामधील विविध सामाजिक संस्थांना नॅपकिन्स, सतरंज्या, राख्या व मिठाई भेट देण्यात आली. कार्यक्रमास विमल संघवी, नितीन जैन, संतोष राठोड, तुषांत राठोड, हिराचंद राठोड, महावीर पारेख, संतोष परमार, राजू नाणेचा, हितेश जैन, नरेंद्र ओसवाल, जीवन शहा, कल्पेश जैन, सुनील जैन, बाळा ओसवाल आदी उपस्थित होते .
कृत्रिम अवयव
केंद्रात रक्षाबंधन
पुणे : दि पूना होलसेल ग्रेन अॅण्ड ग्रोसरी मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांच्या कुटुंबीयांनी वानवडी येथील कृत्रिम अवयव सेंटर येथील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. कार्यक्रमास आॅफिसर कमांडर एस. के. सिंग, ब्रिगेडियर एस. आर. घोष, जे. एस. राव, आर. एन. गुर्जर आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष संजय चोरबेले, उपाध्यक्ष नितीन ओस्तवाल, सचिव विकास बोरा, देवेंद्र अगरवाल, सुनील शिंगवी, अतुल गुंदेचा, सुहास दोशी, मनोज लोढा व संतोष यांनी सहपरिवार उपस्थित राहून जवानांचे औक्षण केले.
मैत्री युवा संस्थेत मुलांना धान्य
पुणे : मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने बुधवार पेठेतील सहेली या संस्थेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे झाले. संस्थेतील मुलांना धान्य व खेळण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सहायक पोलीस निरीक्षक सूरज पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, प्रतीक्षा पारखी, मधुरा गोकर्ण, प्रतीक लांजेवार उपस्थित होते.