पुण्यातील ज्येष्ठाचा अनोखा संकल्प! ८१ व्या वर्षात '८१ किल्ले' सर करणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:37 PM2021-11-02T17:37:13+5:302021-11-02T17:37:23+5:30
शिवनेरी सर करून सेवानिवृत्त रडार इंजिनिअर अरविंद दीक्षीत यांच्या उपक्रमाचा आरंभ
जुन्नर : वयाच्या ८० वर्षाचा वाढदिवस साजरा करून नौदलातील सेवानिवृत्त रडार इंजिनिअर अरविंद दीक्षित यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. ८१ व्या वर्षात महाराष्ट्रातील ८१ किल्ले सर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवनेरी सर करून दीक्षीत यांनी उपक्रमाचा आरंभ केला आहे.
वयाच्या ७५ वर्षानंतर अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून असे संकलप करत ते अनेकांचे प्रेरणास्त्रोत बनले आहेत. वय हा केवळ नंबर असतो, कधीही आपण वयोवृद्ध झालो असा विचार करून जगू नका. नेहमी उत्साही रहा, कार्यक्षम राहण्यासाठी मनाने आनंदी रहा असे सांगत वयाच्या ७५ व्या वर्षी पिंपरीतील टेल्को ग्राऊंडला ७५ फेऱ्या मारून, ७७ व्या वर्षी ७७ किमी सायकल चालवून, वयाच्या ८० व्या वर्षी ८० मजले पायी चढऊतार करून त्यांनी वाढदिवस साजरे केले आहेत.
किल्ले शिवनेरीची चढाई करून दीक्षित यांनी शिवजन्मस्थळी तिरंगा ध्वज फडकावून अभिवादन करून या उपक्रमाला सुरुवात केली. शिवनेरीच्या भेटीनंतर दीक्षीत यांनी चाकण येथील भुईकोट किल्ल्याला भेट दिली