अनोखी ‘स्वरपरिक्रमा’

By Admin | Published: April 26, 2017 04:21 AM2017-04-26T04:21:14+5:302017-04-26T04:21:14+5:30

बाणेर भागात संगीताच्या प्रचार व प्रसारकार्यात असलेल्या ‘साऊंड आॅफ बिट्स’तर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा बहारदार कार्यक्रम भीमसेन जोशी सभागृहात रंगला.

Unique 'self-introduction' | अनोखी ‘स्वरपरिक्रमा’

अनोखी ‘स्वरपरिक्रमा’

googlenewsNext

औंध : बाणेर भागात संगीताच्या प्रचार व प्रसारकार्यात असलेल्या ‘साऊंड आॅफ बिट्स’तर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा बहारदार कार्यक्रम भीमसेन जोशी सभागृहात रंगला.
‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात उ. रईस बालेखान यांची सतार व दीपक भानुसे यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम रंगला. त्यांनी सुरुवातीस देस व नंतर यमनकल्याण सादर करून रसिकांची दाद मिळविली. उत्तरार्धात प्रतीक राजकुमार यांची अ‍ॅफॉस्टिक स्पॅनिश गिटार व राजसकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलिनवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी गिटार-व्हायोलिन जुगलबंदीमध्ये राग चारुकेशी व राग हंसध्वनी सादर केला. त्यांना तबल्याची साथ अतुल कांबळे व ड्रमसेटची संगत केदार घोडके यांनी केली.
शास्त्रीय संगीतावर आधारित फ्युजन संगीताच्या या अभिनव प्रयोगास रसिकांनी दाद दिली. ‘स्वरपरिक्रमा’च्या माध्यमातून सतार-व्हायोलिन-गिटार-बासरी-तबला-ड्रम्स अशा विविध वाद्यांची अनुभूती एकत्रितपणे अनुभवायची संधी रसिकांना मिळाली. सूत्रसंचलन नयन गुळुंजकर, समीर नागर यांनी केले. पं. अतुलकुमार उपाध्ये यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Unique 'self-introduction'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.