कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताप्रमाणे कडक अंमलबजावणी अमेरिकेत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 07:08 PM2020-03-28T19:08:57+5:302020-03-28T19:10:29+5:30
भारतीय नागरिकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.
पुणे: चीनमधून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली. आता हा विषाणू संपूर्ण जगात थैमान घालत आहे. तर सद्यस्थितीत अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. इटलीमध्ये दिवसेंदिवस हा कोरोना होणा?्या रूग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ४० हजाराहून आधिक कोरोना रुग्ण आहेत. तर फ्लोरिडा मध्ये २ हजार ५०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अमेरिकेत अजूनही संचार बंदी घोषित केली नाही. पण इतर व्यवसाय, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण भारताप्रमाणे कडक अंमलबजावणी केली नाही.असे मत अमेरिकेत राहणाऱ्या रोहित गायकवाड याने 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असून कोरोनामुळे होणारा कोविड १९ आजार झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसारखा विकसित देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे. भारत सरकारने इतर देशांची परिस्थिती पाहता संचार बंदी घोषित केली आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.
रोहित म्हणाला, अमेरिकेत अजूनही संचार बंदी घोषित केली नाही. पण इतर व्यवसाय, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण भारताप्रमाणे कडक अंमलबजावणी केली नाही. जीवनावश्यक वस्तू बरोबरच रेस्टॉरंट आणि हॉटेल्स येथे उघडी आहेत. नागरिकांना रस्त्यावर फिरण्यासही मुबा देण्यात आली आहे. पण भारत सरकारने परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे. त्यामुळे आपल्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांनी सरकारी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांमधे ३० ते ६० वयोगट असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर त्यापाठोपाठ ६० वषार्पुढीलही ज्येष्ठ लोकांमध्ये वाढ होत चालली आहे. न्यूयॉर्कची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे. की, एक व्हेंटिलेटरवर दोन रुग्णांना ठेवावे लागत आहे. हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासू लागल्याने रुग्णांना कॉरिडॉरमध्ये झोपण्याची वेळ आली आहे. अमेरिकन सरकार जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून देत नाही. त्यामध्ये एका कुटुंबाला मर्यादित वस्तूच दिल्या जातात. असेही त्याने सांगितले.