विद्यापीठांनी हॅकेथॉन स्पर्धा घ्याव्यात - अशोक भक्तवत्सलम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:36+5:302021-05-06T04:11:36+5:30
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे कला, व्यवस्थापन आणि टेक्नॉलॉजी विषयांवर तीन दिवसीय जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, ...
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे कला, व्यवस्थापन आणि टेक्नॉलॉजी विषयांवर तीन दिवसीय जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी केजीएमपी स्किल डेव्हलपमेंट चे प्रमुख आणि एज्युकेशन प्रमुख नारायण रामास्वामी, राष्ट्रीय केमिकल लेबॉर्टीचे वरिष्ठ संशोधक अशोक गिरी, एमआयटी ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनिता कराड, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी आदी उपस्थित होते.
डॉ. सुनीता कराड यांनी प्रस्तावना केली. प्रा. स्नेहा वाघटकर आणि प्रा. स्वप्नील शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रामचंद्र पूजेरी यांनी आभार व्यक्त केले.