विद्यापीठाने असे पकडले गैरप्रकार करणारे विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:15+5:302021-04-21T04:11:15+5:30
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा घेतले जात आहे. ...
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा घेतले जात आहे. या परीक्षेसाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर केला आहे. परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांनी मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या कॅमेरा समोरून हलू नये, अशा सूचना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. कॅमेरासमोर एकापेक्षा अधिक चेहरे आल्यास किंवा चेहरा बदलल्यास विद्यापीठाच्या यंत्रणेला याबाबतची माहिती होते. त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना अलर्ट देऊनही त्यांनी परीक्षेच्या नियमांचे पालन केले नाही तर परीक्षा आपोआप बंद होते.
विद्यापीठाने आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांमध्ये त्याच विद्यार्थ्याचा पीआरएन नंबर छापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने फोटो काढण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित विद्यार्थी त्या माध्यमातून पकडला जाणार आहे. विद्यापीठातील परीक्षा विभागाचे दोन कर्मचारी व परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे दोन कर्मचारी असे चार कर्मचारी प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधत आहेत.
--
विद्यापीठ यंत्रणेच्या नजरेतून विद्यार्थी गैरप्रकार करताना सुटणार नाही. इमेज प्राॅक्टर्डच्या माध्यमातून माध्यमातून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियमांचे गांभीर्यपूर्वक पालन करून परीक्षा द्यावी.
- प्रा. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--
१ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांनी दिली मंगळवारी परीक्षा
विद्यापीठातर्फे मंगळवारी १५२ विषयांची परीक्षा घेतली. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तीनही सत्रांत एकूण १ लाख ५८ हजार ६१९ विद्यार्थी परीक्षा देणार होते. त्यातील १ लाख ५४ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी मंगळवारी परीक्षा दिली.