सोमवारपासून विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:11+5:302021-07-12T04:08:11+5:30
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ...
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सराव करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन विद्यापीठाच्या कंपनीमार्फत पहिल्या सत्राच्या परीक्षेनंतर आता दुस-या सत्राची परीक्षासुद्धा घेतली जात आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षेस विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या. दुस-या सत्राची परीक्षा सुद्धा विनाअडथळा पार पडावी, यासाठी त्यात काही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहे.
महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण केली आहे. एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन कंपनीच्या कर्मचा-यांसह विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणतीही अडचण येऊ नये याबाबत काळजी घेत आहेत. ऑनलाइन परीक्षा देताना लॉग-इन संदर्भात काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ४८ तासांच्या आत विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
प्रथम सत्राप्रमाणे द्वितीय सत्राची परीक्षासुद्धा प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. परीक्षाबाबत कोणतीही अडचण आल्यास विद्यापीठाने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा चॅट बॉक्सद्वारे संपर्क साधावा, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
------------
सोमवारी होणा-या परीक्षेची आकडेवारी
विद्याशाखा पेपर परीक्षार्थी विद्यार्थी
विज्ञान ३६ २८६५५
अभियांत्रिकी १५ ४३७७६
वाणिज्य १३ ९६२
वास्तुविशारद ०४ १२७८
विधी ०६ २१३३
-------------