विद्यापीठाच्या परीक्षा आॅनलाईन होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:34+5:302021-02-07T04:11:34+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या शैक्षणिक वषार्मुळे यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा आॅफलाइन ऐवजी आॅनलाइन पद्धतीने ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या शैक्षणिक वषार्मुळे यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा आॅफलाइन ऐवजी आॅनलाइन पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात. तसेच येत्या मंगळवारी ( दि.९) विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील सर्वच विद्यापीठांना कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घ्यावी लागली. पुणे विद्यापीठाने सुद्धा अंतिम वर्षाच्या व अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली. आॅनलाइन परीक्षा घेताना सुरुवातीला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला व विद्यार्थ्यांना सुध्दा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु ,टप्प्याटप्प्याने आॅनलाईन परीक्षेमध्ये सुधारणा झाली. विद्यापीठाने सुद्धा आॅनलाइन परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला. आॅनलाइन परीक्षा घेतल्यामुळे बहुतांश सर्व परीक्षांचा निकाल एक ते दोन महिन्याच्या आत प्रसिद्ध करणे शक्य झाले. आॅनलाइन परीक्षांमुळे वेळेची बचत होता असून निकालही लवकर लागत आहे. त्यामुळे विद्यापीठच आॅनलाइन परीक्षा घेण्यासाठी अनुकूल आहे.
आॅफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे ७० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील तब्बल सात लाख विद्यार्थी ची परीक्षा घ्यावे लागणार आहे. आॅफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास सुमारे 30 ते 31 लाख उत्तरपत्रिकांची तपासणी शिक्षकांना करावी लागेल. तसेच प्रथम सत्राची परीक्षा संपून द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला अवधी मिळणार नाही. त्यामुळे आॅफलाइन ऐवजी आॅनलाईन पद्धतीने अधिक कडक प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब करून परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याशिवाय आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने त्यास मान्यता दिल्याशिवाय अंतिम निर्णय जाहीर केला जाणार नाही,असे सूत्रांनी सांगितले.