विद्यापीठात वाढला टग्यांचा उपद्रव
By admin | Published: November 22, 2014 11:18 PM2014-11-22T23:18:06+5:302014-11-22T23:18:06+5:30
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून काही ‘टग्यां’चा उपद्रव वाढला
Next
पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून काही ‘टग्यां’चा उपद्रव वाढला असून दिवसाढवळ्या मारहाणीपासून ते विद्यार्थीनींच्या छेडछाडीर्पयत त्यांची मजल गेल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षामध्ये घडलेल्या घटनांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. परंतु, त्यावर उपाययोजना करण्यात विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळेच शुक्रवारी विद्यापीठाच्या आवारात काही मुलांनी तलवारी आणि हॉकी स्टिक घेवून मारामारी केल्याची घटना घडली.
विद्यापीठाच्या सेवक वसाहतीतील मुलांमध्ये आणि विद्यापीठाबाहेरील मुलांमध्ये शुक्रवारी हातात तलवारी घेवून मारामारी झाली. दिवसा ढवळ्या विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्या आवारात तलवारी उपसल्या जातात. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात कोणीही येवून काहीही करू शकतो, असाच अर्थ काढला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाला आयुका गेट मार्गे येणा-या वाहनांवर आणि मुख्य प्रवेश द्वारातून ये- जा करणा-या वाहनांवर अधिक चाणाक्षपणो लक्ष द्यावे लागणार आहे. विद्यापीठाने सुरक्षेबाबत काही योजना आखल्या आहेत. परंतु,त्या जलद गदीने राबविण्यात विद्यापीठ अपयशी ठरत आहेत.
विद्यापीठच्या आवारात एका प्रेमी युगलाने विद्यापीठच्याच एका सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणोविषयी प्रश्नचिन्ह निमाण व्हायला सुरूवात झाली. परिणामी विद्यापीठाने काही बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची विद्यापीठात नियुक्ती केली. परंतु,सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाकडे स्वत:चे 30 ते 35 आणि सुमारे 100 कंत्रटी तत्त्वावरील सुरक्षा रक्षक आहेत. या सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा आहे. ते तोकडे पडत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सीसीटीव्ही
कॅमे-यांच्या सहाय्याने विद्यापीठात येणा-या जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवावी लागणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाने परिसरातील पुतळ्यांच्या सुरक्षेकडे मात्र गंभीरपणो लक्ष दिले असल्याचे निदर्शनास येत आहे. आजर्पयत याबाबत कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार घडलेला नसल्याचे चित्र आहे. पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु, विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि विद्यापीठातून बाहेर पडणा-या मार्गावर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच या सीसीटीची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.