विद्यापीठ अधिष्ठाता मुलाखती ९ सप्टेंबरला होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:32 PM2019-08-27T20:32:25+5:302019-08-27T20:36:01+5:30

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शासनातर्फे अधिष्ठात्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

University Interview for dean post on September 7 | विद्यापीठ अधिष्ठाता मुलाखती ९ सप्टेंबरला होणार

विद्यापीठ अधिष्ठाता मुलाखती ९ सप्टेंबरला होणार

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी दोन अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या मानवविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या अधिष्ठाता पदासाठी येत्या ९ सप्टेबर रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान व आंतर-विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखेच्या पात्र उमेदवारांच्या मुलाखतींच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शासनातर्फे अधिष्ठात्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.पात्र अर्जांची छाननी करून विद्यापीठाने अधिष्ठाता पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. आता येत्या ९ सप्टेबर रोजी विद्यापीठाच्या मानवविज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या दोन विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदाच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे या पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत शिक्षण वतुर्ळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
वाणिज व व्यवस्थाप विद्याशाखेसाठी आनंदराव दडस, दत्तात्रय गुजराथी, किशोर जगताप, पराग काळकर, प्रकाश करमडार, गंगाधर कायंदेपाटील, नितीन घोरपडे, यशोधन मिठारे, मनीमला पुरी, युवराज थोरात हे १० उमेदवार पात्र आहेत. तर मानविज्ञान विद्याशाखेसाठी सदानंद भोसले, अशोक चासकर, भौमिक देशमुख, बाळकृष्ण कांबळे, विजय खरे,अंजली कुरणे, विजया नागे, दिनेश नाईक, लक्ष्मण शितोळे, ज्ञानदेव तळुले, संजय तुपे हे ११ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र आहेत. मानविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता पद नाशिक जिल्ह्याला मिळू शकते, अशी चर्चा विद्यापीठ वतुर्ळात सुरू आहे.
 विज्ञान व तंत्रज्ञान आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखेच्या विषय तज्ज्ञांनी मुलाखतीसाठी वेळ दिलेला नाहीत. त्यामुळे या विद्याशाखेच्या उमेदवारांच्या मुलाखती काही दिवसांनी घेतल्या जाणार आहेत.विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी दोन अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: University Interview for dean post on September 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.