विद्यापीठ करणार ई-कचऱ्याचा पुनर्वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:48 AM2018-10-29T02:48:14+5:302018-10-29T02:48:46+5:30

रुसाकडून ५१ कोटींचा निधी मंजूर : रिकॉन्फिगरेबल प्रणालीचा वापर

University to reuse e-waste | विद्यापीठ करणार ई-कचऱ्याचा पुनर्वापर

विद्यापीठ करणार ई-कचऱ्याचा पुनर्वापर

Next

- राहुल शिंदे 

पुणे : देशात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाºया ई-कचºयाचा पुनर्वापर करता यावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने इलेक्ट्रॉनिक सिस्टिम अ‍ॅण्ड मॅनिफॅक्चरिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील काही मोजक्याच देशात इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरमध्ये वापरल्या जाणाºया रिकॉन्फिगरेबल कॉम्प्युटिंग प्रणालीचा (पुनरुत्पादन योग्य संगणक) वापर आता भारतातही अधिक चांगल्या प्रकारे होणार आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानातर्फे (रूसा) ५१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे सध्या जगभरात इलेक्टॉनिक हार्डवेअर मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जातात. भारतही त्यात मागे राहिला नाही. मोबाइल फोन, लॅपटॉप, प्रिंटर आदी इलेक्टॉनिक वस्तू निर्माण करणाºया कंपन्यांचे जाळे देशभर पसरले आहे. मात्र, त्यातून निर्माण होणारा ई-कचरा हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. सध्या देशातील ई-कचरा जहाजामध्ये भरून अरबी समुद्रामध्ये टाकून दिला जातो. मात्र, या ई-कचºयाचा पुनर्वापर करणे शक्य आहे. सध्या सॉफ्टवेअर अपग्रेड करतो. त्याचप्रमाणे आता हार्डवेअरही अपग्रेड करता येणार आहे.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, केंद्र शासनातर्फे दरवर्षी इलेक्ट्रॉनिक्स विषयक धोरण प्रसिद्ध केले जाते. केंद्राच्या २०१० पासून ते २०१३ पर्यंतच्या प्रत्येक धोरणामध्ये २०२० पर्यंत इंधन किंवा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची आयात कमी करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, भारताला परदेशातून इंधन आयात बंद करणे शक्य नाही. मात्र, इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरसाठी आपण पर्याय उपलब्ध करू शकतो. चीन, युरोपमध्ये रिकॉन्फिगरेबल कॉम्प्युटिंग पद्धती अस्तित्वात आहे. चीनने या पद्धतीचा अवलंब करून थ्रीजीवरून फोरजीमध्ये केवळ पंधरा मिनिटांमध्ये पदार्पण केले. अनेकांचा विश्वास बसणार नाही. परंतु, देशातील विविध ठिकाणचा ई-कचरा अरबी समुद्रात फेकून दिला जातो.

ई-वेस्टचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन
सध्या देशात ई-वेस्ट (ई-कचरा) खूप मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे. परंतु, रिकॉन्फिगरेबल कॉम्प्युटिंग सिस्टिमचा वापर केल्यास हार्डवेअर अपग्रेड होईल. त्यामुळे देशातील ई-कचºयाचे प्रमाण कमी करता येईल. तसेच ई-कचरा समुद्रात फेकून देण्याऐवजी त्याचा पुनर्वापर होईल. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे इलेक्ट्रॉनिक सिस्टिम अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर सुरू केले जाणार आहे. तसेच रिकॉन्फिगरेबल कॉम्प्युटिंग क्षेत्रात काम करणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी पदविका अभ्यासक्रमापासून पदवी व पीएच.डी पर्यंतचे मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही अभ्यंकर म्हणाले.

Web Title: University to reuse e-waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.