विद्यापीठातील क्रीडा संकूल ‘ट्रॅक’वर

By admin | Published: November 15, 2015 12:53 AM2015-11-15T00:53:36+5:302015-11-15T00:53:36+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात क्रीडा संकूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र,गेल्या काही महिन्यांपासून त्याचे कामकाज संथ गतीने सुरू होते.

University sports complex 'Track' | विद्यापीठातील क्रीडा संकूल ‘ट्रॅक’वर

विद्यापीठातील क्रीडा संकूल ‘ट्रॅक’वर

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात क्रीडा संकूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र,गेल्या काही महिन्यांपासून त्याचे कामकाज संथ गतीने सुरू होते. परंतु,या महिना अखेरीस विद्यापीठातर्फे ४०० मिटर सिंथेटिक रनिंग ट्रक बांधण्याची निविदा काढली जाणार आहे. त्याच प्रमाणे इनडोअर ग्रेम्ससाठी स्वतंत्र स्टेडियमही उभारले जाणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात चांगल्या दर्जाचे खेळाचे मैदान आणि खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठतर्फे घेण्यात आला. त्यास सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला. विविध खेळांची मैदाने तयार करण्याचे काम संथ गतीने सुरू होते. विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर.व्ही.पाटील म्हणाले, विद्यापीठकडील ४११ एकर जागेतील काही जागा आयुका,वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट या संस्थांना देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तब्बल २५ एकर जागा रस्ता रुंदीकरणात गेली आहे. त्यामुळे विद्यापीठाकडे सुमारे ३६० एकर जागाच उपलब्ध आहे. उपलब्ध जागेत नवनवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.

Web Title: University sports complex 'Track'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.