विद्यापीठाच्या बीसीयूडींनी सोडला पदभार
By admin | Published: February 15, 2017 02:44 AM2017-02-15T02:44:09+5:302017-02-15T02:44:09+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालक (बीसीयूडी) डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मंगळवारी आपला पदभार सोडला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालक (बीसीयूडी) डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मंगळवारी आपला पदभार सोडला. त्यामुळे विद्यापीठाच्या बीसीयूडीपदाची सूत्रे कोणाच्या हाती दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विद्यापीठाच्या वतीने डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या निरोप समारंभाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, भारती विद्यापीठाचे डॉ. एस. एफ. पाटील, विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी विद्या गारगोटे, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण आदी कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यापीठात सुमारे चार वर्षांहून अधिक काळ त्यांनी बीसीयूडीपदाची व काही महिने परीक्षा नियंत्रक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेने पुन्हा बोलविल्याने गायकवाड हे नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळण्याठी जात आहेत. त्यानंतर नाशिकच्या संदीप विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
डॉ. गायकवाड म्हणाले, विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यातील क्षमता ओळखून कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याला योग्य दिशा देता आली.