विद्यापीठ दोन्ही सत्रांचे निकाल एकत्र लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:32+5:302021-05-26T04:11:32+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. परिणामी विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये जाऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाही. ...

The university will combine the results of both the sessions | विद्यापीठ दोन्ही सत्रांचे निकाल एकत्र लावणार

विद्यापीठ दोन्ही सत्रांचे निकाल एकत्र लावणार

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. परिणामी विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये जाऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाही. सध्या महाविद्यालयांकडून ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे काम सुरू असून येत्या १५ जूनपर्यंत या परीक्षा होणार आहेत. दोन्ही सत्राच्या परीक्षांचे गुण विद्यापीठाला प्राप्त झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा पूर्ण निकाल तयार करता येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने सध्या विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन निकाल उपलब्ध करून दिला आहे.

विद्यापीठाने केवळ ऑनलाइन निकाल प्रसिद्ध केला असून त्यात प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण नाहीत. त्या ठिकाणी ‘एनए’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

------------

प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण प्राप्त झाल्यानंतरच विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करता येतो. यंदा कोरोनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही संत्रांचा निकाल एकाच वेळी जाहीर होणार आहे.

- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: The university will combine the results of both the sessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.