विद्यापीठ मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास केंद्र उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:20 AM2021-02-28T04:20:15+5:302021-02-28T04:20:15+5:30
पुणे : मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा, यासाठी विद्यापीठ कायम ...
पुणे : मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा, यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच लवकाच विद्यापीठात मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारले जाईल, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘भाषा संगीताची’ या कार्यक्रमात डॉ. नितीन करमळकर बोलत होते. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. संतोष परचुरे उपस्थित होते.
कार्यक्रमात गायिका शुभांगी नितीन मुळे यांनी ‘भाषा संगीताची’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. त्यांना हार्मोनियमवर जयंत साने, तबल्यावर मोहन पारसनीस यांनी आणि वादनसाहाय्य रोहन करंदीकर यांनी साथ दिली.