बेकायदा बांधकामे पिंपरीत सुरूच
By Admin | Published: April 26, 2016 01:11 AM2016-04-26T01:11:19+5:302016-04-26T01:11:19+5:30
शासन अध्यादेशाची प्रतीक्षा न करता, कारवाईची टांगती तलवार कायमची दूर झाली, अशी समजूत करून घेतलेल्यांनी राजरोस पुन्हा अवैध बांधकामे सुरू केली आहेत.
पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत मागील महिन्यात शासन स्तरावर सकारात्मक घोषणा झाली. रीतसर शासन अध्यादेशाची प्रतीक्षा न करता, कारवाईची टांगती तलवार कायमची दूर झाली, अशी समजूत करून घेतलेल्यांनी राजरोस पुन्हा अवैध बांधकामे सुरू केली आहेत. आतापर्यंत केलेल्या अवैध बांधकामांवर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला असताना, पुन्हा अशा बांधकामांचा जोर वाढल्याने महापालिका हतबल झाली आहे.
अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत निर्णक्ष अपेक्षित असताना नागरिकांना संयम उरलेला नाही. शासनादेशानंतर अनधिकृत बांधकाम करता येणार नाही, हे लक्षात घेऊन तत्पूर्वीच अनधिकृत बांधकामे उकरण्याची घाई केली जात आहे. (प्रतिनिधी)