अभिनेता सलमान खान विरोधात लोणावळ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 08:24 PM2017-10-09T20:24:17+5:302017-10-09T20:38:33+5:30
'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलावंताला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोणावळा : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलाकाराला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक जुबेर अली खान (वय 39, रा. न्यू म्हाडा बिल्डिंग, एस.एम.बी.पी रोड, मुंबई) यांनी ही याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
जुबेर खान हे 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी असताना 7 ऑक्टोबर रोजीच्या शोच्या दरम्यान रात्री 10.30 वाजता कार्यक्रमाचे होस्ट करणारा अभिनेता सलमान खान याने तुझे कुत्ता बनाऊंगा, तू बाहर निकल तेरे को छोडूंगा नही, असे म्हणून मला दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जुबेर अली खान यांच्या या तक्रारीवरुन सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात भादंवि कलम 506, 34 अंर्तगत हा अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.