दक्षता न घेतल्यास गैरप्रकाराची शक्यता

By admin | Published: April 9, 2015 05:16 AM2015-04-09T05:16:22+5:302015-04-09T05:16:22+5:30

चिंचवड, आकुर्डी, फुगेवाडी, काळेवाडी या भागातील नावाजलेल्या मॉलमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी चेजिंग

Unlawful possibility of misbehaving | दक्षता न घेतल्यास गैरप्रकाराची शक्यता

दक्षता न घेतल्यास गैरप्रकाराची शक्यता

Next

चिंचवड, आकुर्डी, फुगेवाडी, काळेवाडी या भागातील नावाजलेल्या मॉलमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी चेजिंग रूमबाहेर महिला रक्षक असतात. तीन कपड्याच्या जोडीपेक्षा अधिक कपडे जाऊ नयेत, याची दक्षता फक्त ती महिला घेत असते.
सर्वच मॉलमध्ये महिला चेंजिंग रूमच्या दरवाजाला खालून मोठी फ ट आहे. महिलांना कपडे टाकण्यासाठी दरवाजांवरही मोठी जागा काही मॉलमध्ये ठेवण्यात आली आहे, असे शहरातील मॉलच्या निरीक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे कोणतेही अश्लील, गैैरप्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मॉलमधील चेंजिंग रूमबाहेरील महिला सुरक्षारक्षक कोणत्याही कामानिमित्त इतर ठिकाणी जातात. यामुळे कधी-कधी चेंजिंग रूमबाहेर महिला सुरक्षारक्षक नसतात. महिला सुरक्षारक्षकाला चेंजिंग रूमबाहेर १२ तासांची ड्युटी दिलेली असते. मात्र सतत उभे राहण्याच्या ताण-तणावाने या महिलाही कामाच्या ठिकाणी चेंजिंग रूमच्या बाहेर कंटाळा करताना दिसून येतात. यामुळे महिलांची चेंजिंग रूम सुरक्षितता रामभरोसे आहे.
महिलांना कधी घेतलेले कपडे पसंत नसतील, तर महिला चेंजिंग रूममध्येच उभ्या राहतात व महिला सुरक्षारक्षकाला साईजमधील
योग्य कपडे बदलून आणण्यासाठी सांगितले जाते. या वेळी दरवाजा उघडा ठेवला जातो. दरवाजा पूर्णपणे बंद असणे आवश्यक आहे. ही सर्व मॉलमधील परिस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे.

Web Title: Unlawful possibility of misbehaving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.