भटक्या कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, ६५ वर्षांचा सुरक्षारक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:51+5:302021-04-06T04:09:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाच्या विकृतीचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी ...

Unnatural abuse of a stray dog, 65-year-old security guard arrested | भटक्या कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, ६५ वर्षांचा सुरक्षारक्षक अटकेत

भटक्या कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, ६५ वर्षांचा सुरक्षारक्षक अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाच्या विकृतीचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी या ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करणे, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा किळसवाणा प्रकार गेल्या ऑक्टोबरपासून सुरु असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी एका २८ वर्षांच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मॉडेल कॉलनीमधील मिलेनियम सोसायटीमध्ये हा ६५ वर्षांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने रात्रपाळीची ड्युटी करीत असताना भटक्या कुत्र्याला पकडले व त्याला बाजूला नेऊन त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार सुरु असताना फिर्यादी तरुणीला जाग आली. तेव्हा तिने हा सर्व प्रकार पाहिला. तिने प्राणिमित्रांना फोन करुन त्यांची माहिती दिली. त्यांनी तिला या प्रकाराचे ‘व्हिडिओ शूटिंग’ करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर ही तरुणी त्या सुरक्षारक्षकावर लक्ष ठेवून होती. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या त्याने एका भटक्या कुत्र्याला उचलून पार्किंगमध्ये नेले. तेथे त्याने त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या तरुणीने त्याचे ‘व्हिडिओ शूटिंग’ केले. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Unnatural abuse of a stray dog, 65-year-old security guard arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.