खाऊचे आमिष दाखवून 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य, राजगुरूनगर शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 06:37 PM2024-09-22T18:37:48+5:302024-09-22T18:37:56+5:30
घटनेनंतर आरोपीला अटक
राजगुरुनगर: खाऊचे अमिष दाखवून पाच वर्षीय मुलावर अनैसिर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एकास खेड पोलिसांनी अटक केली आहे. विजय बाळु ताठोड
उर्फ गोल्या (वय २४ रा. माळीमळा राजगुरूनगर ता. खेड ) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ( दि २२ ) रोजी राजगुरूनगर शहरातील माळीमळा येथील घुमटकर यांचे चाळीजवळ दुपारी घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत असताना तुला खावू देतो, असे सांगून आरोपीने मुलावर जबरी अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी आरोपीवर बाल लैगिंक अत्याचार अधिनियम 2012 कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे करत आहेत.