जुन्नरला २०१५ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:33 AM2018-03-11T05:33:14+5:302018-03-11T05:33:14+5:30

महाराष्ट्र प्रादेशिक कायद्यानुसार सन २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे प्रशासन निर्देशानुसार आकारणी करून नागरिकांच्या हिताकरिता नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जुन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी ही माहिती दिली.

 Unnatural constructions after June 2015 to Abhay | जुन्नरला २०१५ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना अभय

जुन्नरला २०१५ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना अभय

Next

जुन्नर - महाराष्ट्र प्रादेशिक कायद्यानुसार सन २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे प्रशासन निर्देशानुसार आकारणी करून नागरिकांच्या हिताकरिता नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जुन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी ही माहिती दिली.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात झाली. सभेत शहर विकासाच्या संदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. तांत्रिक मान्यता प्राप्त झालेल्या ३ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ करिता वार्षिक दर कराराच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पाणी विभाग, आरोग्य विभाग, वीज विभाग, अतिक्रमण विरोधी पथक नेमणे, तसेच शहरातील मोकाट जनावरे, कुत्री पकडणे आदी कामांना येणाºया खर्चाला मंजुरी देण्यात आली.
या सर्वसाधारण सभेप्रसंगी उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे, शिवसेनेचे गटनेते दीपेश परदेशी, आघाडीचे गटनेते जमीर कागदी, नगरसेवक फिरोज पठाण, समीर भगत, अविन फुलपगार, भाऊ कुंभार, कविता गुंजाळ, हाजरा इनामदार, सना मनसुरी, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, अश्विनी गवळी, मोनाली म्हस्के तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

ऐन वेळच्या विषयात शहरातील अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याबाबत पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. त्यास पालिका प्रशासनातर्फे पूर्णपणे सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

४येणारा उन्हाळा ध्यानात घेता शहराला पाणीटंचाईच्या
झळा बसू नयेत, यादृष्टीने पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
४शहरातील सर्व स्मशानभूमी,दफनभूमी या ठिकाणी तातडीने बोअर कूपनलिका घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आला.
४नगर परिषदेने प्राप्त झालेल्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामांना प्रशासकीय मंजुरी या सभेत देण्यात आली.

Web Title:  Unnatural constructions after June 2015 to Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.