चुकीच्या वीजबिलाचा वीजग्राहकांना नाहक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:47+5:302021-05-22T04:09:47+5:30
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगावशेरी मतदारसंघाचे विभाग सचिव रमेश जाधव यांनी कल्याणीनगर महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता अशोक जाधव ...
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगावशेरी मतदारसंघाचे विभाग सचिव रमेश जाधव यांनी कल्याणीनगर महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना निवेदन दिले. या वेळी मनसे विभाग अध्यक्ष सुनील कदम, प्रभाग अध्यक्ष महेश शिर्के, गणेश पाटील, जेमा चव्हाण, मनोज ठोकळ, लक्ष्मण काते, निखिल पवार व पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर चाळ येथील (१६०२३४९७५७४६) हा वीज ग्राहक क्रमांक असलेल्या नागरिकाला १५ मे च्या बिलात ३४२० रीडिंगप्रमाणे बिल आकारले आहे. मात्र त्या मीटरचे रिडिंग दि.२० मे २०२१ रोजी ३३९८ आहे. महावितरणाच्या या अंदागोंदी कारभारमुळे नाहक जास्तीचे बिल भरावे लागते. वीजबिले कोणत्या आधारावर काढली, कमी येणारे बिल जास्त कसे आले विचारले असता महावितरण कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.तसेच नागपूर चाळ व परिसरातील अनेक नागरिकांना वीजबिल मिळतच नाही. नगर रोड महावितरण कार्यालयात वीजग्राहक वीजबिल घ्यायला गेले असता तेथे अनेक दिवस प्रिंटर बंद असल्याने वीज बिल दिले जात नाही.
नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील वीज ग्राहकांना कल्याणीनगर येथील येथील कार्यालयात न पाठविता नगर रोड येथील कार्यालयात नागरिकांच्या बिलाच्या तक्रारींबाबत निरसन करावे. तेथील वीज बिल प्रिंटर त्वरित चालू करावा, असे देखील या निवेदनात रमेश जाधव यांनी म्हटले आहे.