पब-हुक्क्याची अनधिकृत बेटे : एफडीए-पोलिसांकडे नाही नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 03:09 AM2017-12-31T03:09:13+5:302017-12-31T03:09:17+5:30

पब आणि हुक्का पार्लरची अनधिकृत बेटे निर्माण झाली असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच प्रभावी आस्थापना नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अशा आस्थापनांना परवानगीच दिले नसल्याचे सांगितले.

 Unofficial Islands of Pub-Hukka: No entry to FDA-Police | पब-हुक्क्याची अनधिकृत बेटे : एफडीए-पोलिसांकडे नाही नोंद

पब-हुक्क्याची अनधिकृत बेटे : एफडीए-पोलिसांकडे नाही नोंद

Next

- विशाल शिर्के
पुणे : पब आणि हुक्का पार्लरची अनधिकृत बेटे निर्माण झाली असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच प्रभावी आस्थापना नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अशा आस्थापनांना परवानगीच दिले नसल्याचे सांगितले. तर पोलिसांनी गेल्या चार वर्षांत १४४ हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे.
मुंबई येथील पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा नाहक बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पब आणि हुक्का पार्लरचा वेध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. त्यात मात्र पब आणि हुक्का पार्लरला ना पोलिसांनी परवानगी दिली, ना अन्न आणि औषध प्रशासने. तरीही शहरात याची बेटे निर्माण कशी झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे. हुक्का पार्लरला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी गेल्या चार वर्षांत त्यांच्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चारवर्षांत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अकडा १८वरुन ४४वर गेला आहे. तसेच अशी पार्लर आढळल्यास संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे उत्तर पोलिस प्रशासनाने माहिती अधिकारात दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. हॉटेल अथवा स्नॅकसेंटर असल्याचे भासवून अशी हुक्का पार्लर चालविली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पब आणि हुक्का पार्लरमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय दिली जातात. म्हणजे एफडीएशी देखील या आस्थापनांचा संबंध येतो. त्यावरुन एफडीए करीत असलेल्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.
एफडीएने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने हुक्का पार्लरला परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या कारवाईची माहिती देखील निरंक असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलिसांनीही एकाही पबला परवानगी दिली नसल्याचे सांगितले. महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांकडेच त्यांची माहिती उपलब्ध नसल्याने, अशा केंद्रांच्या कोणत्याची तपासणीची शक्यताच नाही.

एफडीएचे सहायक आयुक्त संपत देशमुख म्हणाले, हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्रेते, क्लब, कॅन्टीन, पंचतारांकीत हॉटेल यांना एफडीएचा परवाना दिला जातो. जिथे खाद्यपदार्थ येतील त्यांना परवाना बंधनकारक आहे. मात्र, हुक्क पार्लरअथवा पबला परवाना देण्यात आला नाही.

पबला पोलीसांकडून कोणतीही परवानगी दिली जात नाही. तसा पोलीस परवाना देण्याचा अधिकार नाही.
शेषराव सूयर्वंशी,
पोलीस उपायुक्त प्रशासन

Web Title:  Unofficial Islands of Pub-Hukka: No entry to FDA-Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे