शिरूर शिक्षक पतसंस्थेच्या सभापतिपदी श्वेता करपे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:25+5:302021-07-23T04:08:25+5:30
शिरूर येथे झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक बाळासाहेब ...
शिरूर येथे झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक बाळासाहेब खामकर, शिवाजीराव वाळके, संभाजी धुमाळ, कल्याण कोकाटे, संजय तळोले, नीलेश गायकवाड, बाळासोा आसवले, प्रदीप गव्हाणे, संध्या धुमाळ, वंदना पाचर्णे, संभाजी फराटे, सोमनाथ गायकवाड, कार्यकारी संचालक शशिकांत बढे, सतीश ढेकणे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या या शिक्षक पतसंस्थेची सभासद संख्या१५५१ असून भाग भांडवल २७ कोटी आहे. संस्थेने सभासदांना ८.९० दराने ११३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेत सभासदांच्या सुमारे ६२ कोटी ठेवी असून ४० कोटींचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेला सुमारे २ कोटी ६५ लाख नफा झाला असून यापुढील काळात पारदर्शक कारभाराची परंपरा कायम राखत कोरोना महामारीच्या काळात सहकार खात्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वार्षिक सभा घेऊन लवकरच सभासदांना हक्काचा लाभांश देण्यास प्रथम प्राधान्य राहिल, असे मत श्वेता करपे यांनी व्यक्त केले.
फोटो
220721\foto01 22 07 21.jpg
फोटो श्वेता करपे सभापती,विकास गायकवाड उपसभापती