भांडगाव ग्रामपंचायतीवर बिनविरोध पॅनलचाच विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:09+5:302021-01-21T04:11:09+5:30
भांडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुल व थोरात गटात तुल्यबळ लढत रंगते. मात्र यावेळी आमदार राहुल कुल व ...
भांडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुल व थोरात गटात तुल्यबळ लढत रंगते. मात्र यावेळी आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटातील पॅनल प्रमुखांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुल गटाला ६ जागा तर थोरात गटाला ५ जागा असे सत्तेचे अडीच अडीच वर्षे ठरले होते. ५ जागा असणाऱ्या प्रथम सरपंच पद व दुसऱ्या गटाला उपसरपंच पद तर पुढील अडीच वर्षांनंतर दुसऱ्या गटाला सरपंच व उपसरपंच पदाचे वाटप ठरले होते.
दोन्ही गटात ठरलेल्या समझोत्याप्रमाणे ११ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या मात्र कुल व थोरात गटातील काहींना निर्णय न पटल्याने ४ जागांसाठी निवडणूक लागली होती. ४ जागांसाठी बिनविरोध पॅनल व अपक्ष यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली.यात २ जागा अपक्षांना तर २ जागांवर बिनविरोध पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली.
चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे यांचे पुत्र संतोष दोरगे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले तर सदाशिव कुंडलिक दोरगे, अपक्ष शीतल विजय दोरगे व प्रमोद रामचंद्र दोरगे यांनी जोरदार लढत देत विजय संपादन केला.
चार जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर सत्तेची गणिते बदलली असली तरी बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेणाऱ्या पॅनल प्रमुखांनी सत्तेचा फॉर्म्युला आगोदर ठरलेल्या प्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुल गटाच्या वतीने लक्ष्मण काटकर, लक्ष्मण दोरगे व दत्तात्रय दोरगे तर थोरात गटाच्या वतीने माजी पंचायत समिती सभापती मधुकर दोरगे, विद्यमान उपसभापती नितीन दोरगे व विजय ढोणे यांनी प्रयत्न केले.
निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
वार्ड क्रमांक १ :- सदाशिव कुंडलिक दोरगे, प्रमोद रामचंद्र दोरगे व सिंधू शंकर हरपळे
वार्ड क्रमांक २ :- तुषार राजू दोरगे, नंदा नवनाथ जाधव व रूपाली राहुल खळदकर,
वार्ड क्रमांक ३ :- सुनंदा सदाशिव गायकवाड व शीतल विजय दोरगे
वार्ड क्रमांक ४ :- लक्ष्मण बबन काटकर, संतोष मधुकर दोरगे व नीलम संदीप दोरगे
२० यवत भांडगाव
भांडगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध पॅनलने बाजी मारल्यानंतर ग्रामदैवत रोकडोबानाथ मंदिरात विजय साजरा केला.