Pune Rain | जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातही अवकाळी पाऊस; पिकांचे प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:33 PM2023-03-07T15:33:46+5:302023-03-07T15:34:10+5:30
शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल...
आळेफाटा (पुणे) :जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात काल सायंकाळनंतर व आज पहाटेच्या वेळेस विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाले.
जुन्नर तालुक्याचे पूर्व भागातही काल सायंकाळच्या वेळी वादळी वारे वाहत होते, यानंतर विजेच्या कडकडाटात हलका तर आज पहाटेनंतर तर पुन्हा मध्यम असा अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसाने या भागातील आळेफाटा, राजुरी, बेल्हा व पठारभागातील आणे व परिसरातील शेतातील कापणी झालेला गहू, हरभरा व काढलेले कांदे भिजले.
या पावसाने शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली, तसेच शेतातील पिके झाकणीसाठी धांदल उडाली. या पावसामुळे शेतातील उभी अशी नगदी पिके वाचवण्यासाठी, औषध फवारणीचा खर्च वाढणार याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.