एक जानेवारीपर्यंत सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 07:20 PM2019-12-02T19:20:59+5:302019-12-02T19:23:54+5:30

दोन डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Until January 1, the Sinhagad Ghats road will close for tourists | एक जानेवारीपर्यंत सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद 

एक जानेवारीपर्यंत सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद 

googlenewsNext

पुणे : पुणे आणि आजूबाजूच्या भागातून खास सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पर्यटकांसाठी काहीशी निराश करणारी बातमी आहे. 
सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे पुढील महिनाभरात साठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दोन डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र ज्यांना गडावर जायचे आहे त्यांच्यासाठी पायवाटेचा पर्याय खुला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. 


पावसाळ्यात दरवर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळतात. त्यामुळे घाट रस्ता बंद होतो आणि अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामुळे आज पासून ते 1 जानेवारीपर्यंत हा रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असताना मोठे दगड खाली पडू शकता त्यामुळे पर्यटकांच्या जीवाच्या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. याबाबत वनाधिकारी दीपक पवार म्हणाले की, 'पावसाळ्यात कोणताही अपघात होऊ नये म्ह्णून ही उपाययोजना राबवण्यात आली आहे. पर्यटक गडावर जाऊ शकतात मात्र पायवाटेने. गडाखाली गाडी पार्क करून जाता येणे शक्य आहे. १ जानेवारीपर्यँत जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येईल'. 

Web Title: Until January 1, the Sinhagad Ghats road will close for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.