आवकाळी पावसाचा स्ट्राॅबेरी उत्पादक शेतक-यांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:32+5:302020-12-29T04:10:32+5:30

पुणे : पुण्यासह, सातारा, सोलापूर जिल्हयात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका स्ट्राॅबेरी उत्पादक शेतक-यांना बसला आहे. ...

Untimely rains hit strawberry growers hard | आवकाळी पावसाचा स्ट्राॅबेरी उत्पादक शेतक-यांना मोठा फटका

आवकाळी पावसाचा स्ट्राॅबेरी उत्पादक शेतक-यांना मोठा फटका

Next

पुणे : पुण्यासह, सातारा, सोलापूर जिल्हयात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका स्ट्राॅबेरी उत्पादक शेतक-यांना बसला आहे. यामुळे यंदाचा ख्रिसमसचा हंगाम हुकल्याने शेतकरी अडचणीत आहे. दर वर्षी डिसेंबरमध्ये प्रामुख्याने ख्रिसमस, नव वर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वरची स्ट्राॅबेरी ग्राहकांना भुरळ घालते. यंदा मात्र महाबळेश्वरची स्टाॅबेरी बाजारात येण्यासाठी आणखी 15-20 दिवस लागणार आहे.

दर वर्षी नाताळानिमित्त मोठ्या प्रमाणावर पुण्या, मुंबईसह बाजारात स्ट्राॅबेरी विक्रीसाठी दाखल होते. राज्यात स्ट्राॅबेरी उत्पादनाचे आगार म्हणून ओळखल्या जाणा-या महाबळेश्वर, पाचगणी, वाई भागात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका स्ट्राॅबेरी हंगाम लांबणीवर पडला आहे. सध्या महाबळेश्वरचा स्ट्राॅबेरी हंगाम सुरू झाला नसून, पाच-दहा टक्क्यांपर्यंत माल दाखल होत आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्ट्राॅबेरीचा हंगाम बहरात येतो. अनुकूल वातावरण असल्यास डिसेंबरमध्ये तीन ते साडेतीन टन स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी पाठविली जाते. यंदा ही आवक केवळ तीन ते साडे तीनशे किलो ऐवढीच आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी असल्याने दोन किलोच्या ट्रेची 300 ते 550 रुपये दराने केली जाते. गत वर्षी हेच दर 260 ते सुरू 360 रुपये ऐवढे होते.

-----

दर वर्षी नोव्हेंबरमध्येच स्ट्राॅबेरीची मार्केट मध्ये आवक सुरू होती. तर ख्रिसमसमध्ये हंगाम जोमात असतो. यंदा मात्र ऐन हंगामात मलाचा मोठा तुटवडा जाणवतो. नाताळात स्ट्रॉबेरीच्या मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ होते.

अरविंद मोरे, फळाचे व्यापारी

------

कोरोनामुळे स्ट्राॅबेरीची रोपे तयार करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता होती. लागवड झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अवकाळीचा मोठा फटका बसला आणि नोव्हेंबर महिन्यात येणारे पहिले गळीत पावसात वाया गेले. यामुळेच यंदा ऐन हंगामात स्ट्राॅबेरीचा तुटवडा जाणवत आहे. महाबळेश्वरची स्ट्राॅबेरी पुढील पंधरा दिवसांनी सुरू होईल.

- तानाजी भिलारे, आवकाळी गाव, महाबळेश्वर

Web Title: Untimely rains hit strawberry growers hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.