देऊळगावगाडा येथे अद्ययावत कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:27+5:302021-05-07T04:12:27+5:30

'आमदार निधीतून ' दीपगृह अकॅडेमी देऊळगाव गाडा येथे ऑक्सिजन बेड्स व विलगीकरणासाठी सुरू करत असलेल्या तालुक्यातील सर्वात ...

Updated Kovid Center at Deulgaon Gada | देऊळगावगाडा येथे अद्ययावत कोविड सेंटर

देऊळगावगाडा येथे अद्ययावत कोविड सेंटर

Next

'आमदार निधीतून ' दीपगृह अकॅडेमी देऊळगाव गाडा येथे ऑक्सिजन बेड्स व विलगीकरणासाठी सुरू करत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या

अद्ययावत कोविड केअर सेंटरला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली व सुरू असलेल्या कामाची पहाणी केली. या बाबत माहिती देताना दौंडचे आमदार राहुल कुल म्हणाले की, या ठिकाणी आपण १०० ऑक्सिजन बेड्स तसेच सुमारे २०० विलगीकरण बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार असून या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णाचे सर्व उपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत.

कोव्हीड रुग्णांना सुसज्ज विलगीकरण सुविधा तसेच गरज पडल्यास ऑक्सिजन बेड्स सुद्धा एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या केंद्रावर ऑक्सिजन बेड्स देखील उभारण्यात येत आहे. यावेळी आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, देऊळगावगाडाचे सरपंच विशाल बारवकर, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे, आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ नामदेव बारवकर, माऊली ताकवणे ताकवणे, तुकाराम ताकवणे, विकास शेलार, डॉ. सचिन भांडवलकर व डॉ. संदीप देशमुख आदी उपस्थित होते.

---

चौकट : १०० ऑक्सिजन बेड्स, तसेच सुमारे २०० विलगीकरण बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार असून या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णाचे सर्व उपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत. कोव्हीड रुग्णांना सुसज्ज विलगीकरण सुविधा तसेच गरज पडल्यास ऑक्सिजन बेड्स सुद्धा एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या केंद्रावर ऑक्सिजन बेड्स देखील उभारण्यात येत आहे. या केंद्रावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवश्यक वैद्यकीय पथक, कर्मचारी देखील तैनात करण्याचे नियोजन आपण केलेले आहे.

- राहुल कुल (आमदार, दौंड)

--

फोटो : ०६ खोर देऊळगाववाडा क्वारंटाईन सेंटर

Web Title: Updated Kovid Center at Deulgaon Gada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.