कवडी पाट येथे उन्मळून पडलेली झाडे अजून तशीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:20+5:302021-02-23T04:17:20+5:30
कवडी गाव येथील मुळा-मुठा नदी पात्रात कचरा, प्लास्टिक कागद, जलपर्णीमुळे पाणी पुढे जात नाही. तर, पाटबंधारे विभागाकडून ही जबाबदारी ...
कवडी गाव येथील मुळा-मुठा नदी पात्रात कचरा, प्लास्टिक कागद, जलपर्णीमुळे पाणी पुढे जात नाही. तर, पाटबंधारे विभागाकडून ही जबाबदारी जलसंपदा व जलसंधारण खात्याची असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाच्या या टोलवाटोलवीमुळे हा कचरा गेली सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ नदीपात्र तसेच बंधाऱ्यात अडकून पडला आहे,यामुळे नदीचे पाणी बंधाऱ्यातून जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने पाणी तुंबून त्याच्यावर जलपर्णी जमा झाली आहे.त्यामुळे मच्छर निर्माण होऊन नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
संध्याकाळी ७ वाजल्यानंतर नदी शेजारील नागरिकांना व पाळीव प्राण्यांना दुर्गंधी व मच्छरांचा त्रास होत आहे. संबंधित प्रसाशनाने या अडचणींवर त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
----------------
रात्रभर गाई म्हशींच्या गोठ्यात लाकडे जाळून धूप करण्याची कसरत येथील शेतकरी बांधवांना करावी लागत आहे, पुर्वी पुणे शहरातील काही सामाजिक संस्था येथील पक्षी निरीक्षण केंद्राला दर रविवारी भेट देऊन तेथील कचरा गोळा करून साफसफाई करण्याचे सामाजिक काम करत होत्या. पण बंधाऱ्यात अडकलेली मोठमोठी झाडे व जलपर्णी कढण्यात त्या सामाजिक संस्थाही हतबल झाल्या आहेत.
- सोमनाथ गरूड, स्थानिक शेतकरी