शहरी गरीब योजनेला मिळणार निधी
By admin | Published: December 9, 2014 12:17 AM2014-12-09T00:17:31+5:302014-12-09T00:17:31+5:30
निधीअभावी व्हेंटीलेटरवर असलेल्या महापालिकेच्या शहरी गरीब योजनेसाठी उद्या (मंगळवारी) होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Next
पुणो : निधीअभावी व्हेंटीलेटरवर असलेल्या महापालिकेच्या शहरी गरीब योजनेसाठी उद्या (मंगळवारी) होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत पालिकेकडून देण्यात येणा-या औषधांची आणि खासगी रूग्णालयांची बिले थकल्याने गेल्या महिन्याभरापासून शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनने आरोग्य विभागाच्या अखर्चित निधीतून पुढील पाच महिन्यांसाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शहरी गरीब योजने अंतर्गत पालिकेकडून देण्यात येत असलेली औषधेही संपण्याच्या मार्गावर असून खासगी रूग्णालयांमधील उपचाराचे चार कोटी रूपये थकलेले आहेत. त्यामुळे या रूग्णालयांनीही उपचार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्या होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत या योजनेसाठी तीन कोटींच्या निधीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकास 1क् कोटींची कात्री
शिक्षण मंडळाचा कारभार पालिकेकडे सोपविण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच पालिकेकडून शिक्षण मंडळाचे 2क्15-16 या शैक्षणिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यात मागील वर्षापेक्षा 1क् कोटी कमी खर्चाचे असणार आहे.मात्र शिक्षकांचे आरोग्य, शाळांच्या इमारतीतील देखभाल दुरूस्तीची कामे ही अनुक्रमे महापालिकेच्या आरोग्य आणि भवन विभागाकडे सोपविण्यात आली असून त्यासाठीचा खर्च पालिकेच्या अंदाजपत्रकात असणार आहे. 2क्14-15 या शैक्षणिक वर्षासाठी वर्षी शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक 3क्5 कोटी रुपयांचे होते. यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतन व पेन्शनच्या सुमारे 275 कोटींचा समावेश आहे. तर उर्वरीत 3क् कोटी रुपयांमध्ये विद्याथ्र्यांसाठी गणवेश व इतर शालेय साहित्य खरेदी करण्यात आले आहे. तसेच काही खर्च विविध स्पर्धा व उपक्रमांवर होतो आहे.
शहरी-गरीब योजनेसाठी स्थायी समिती तत्काळ निधी उपलब्ध करुन देईल. आरोग्य विभागासाठी आगामी अंदाजपत्रकात भरघोस निधी देण्याचा प्रय} आहे. - दत्तात्रय धनकवडे, महापौर
अंदाजपत्रकाच्या अखर्चीक रक्कमेमधून शहरी गरीब योजनेसाठी निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. औषध खरेदीला सुध्दा तत्काळ मान्यता देण्यास आमचे प्राधान्य राहिल.
- बापूराव कर्णे गुरूजी,
स्थायी समिती अध्यक्ष