‘कचरामुक्त केंद्र’ करणार, पाच कोटींचे अनुदान देण्याची मागणी - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:58 AM2018-01-30T02:58:31+5:302018-01-30T02:58:42+5:30
इंदापूर नगर परिषदेच्या सार्वजनिक स्वच्छताविषयक कार्याची जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन नगर परिषदेस पाच कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शिफारस त्यांनी शासनास केली आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदापूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला आहे. येथील कचरा डेपो हा ‘कचरामुक्त केंद्र’ करण्याचा नगर परिषदेचा निर्धार आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या सार्वजनिक स्वच्छताविषयक कार्याची जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन नगर परिषदेस पाच कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शिफारस त्यांनी शासनास केली आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला आहे. येथील कचरा डेपो हा ‘कचरामुक्त केंद्र’ करण्याचा नगर परिषदेचा निर्धार आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा व इतर पदाधिकाºयांसमवेत नुकतीच डेपोस भेट दिली. पाहणी केल्यानंतर दुर्गंधीमुक्त झालेल्या या परिसराचे त्यांनी कौतुक केले.
ते म्हणाले की, नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांच्या सहकाºयांनी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ इंदापूरसाठी केलेल्या कामामुळे स्वच्छतेच्या बाबतीत इंदापूर पॅटर्नचा लौकिक संपूर्ण राज्यात होत आहे. नागरिकांनी आपल्याकडे अधिक जबाबदारी घ्यावी.
स्वच्छ व सुंदर इंदापूरसाठी स्वच्छाग्रही व्हावे.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.कदम व शिंदे यांनी त्याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक भरत शहा, कैलासकदम, जगदीश मोहिते, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बापू जामदार, जावेद शेख, गुड्डभाई मोमीन,नितीन मखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिवाणूंची निर्मिती बायोकल्चर
४इंदापूर महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. सागर कदम, ज्ञानेश्वर शिंदे यांनी कचºयाचे विघटन करणे, दुर्गंधी घालवणे याकरिता तयार केलेली जिवाणूंची निर्मिती बायोकल्चर स्वरूपात आहे. त्यामुळे ओल्या कचºयापासून खताची निर्मिती झाली आहे.