उरूळी कांचनला रोजच ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:58 AM2018-08-28T01:58:21+5:302018-08-28T01:58:50+5:30

नियोजनाचा अभाव : वाहनचालक त्रस्त, यंत्रणा ‘मस्त’

Uruli Kanchanla is the traffic jam | उरूळी कांचनला रोजच ‘कोंडी’

उरूळी कांचनला रोजच ‘कोंडी’

googlenewsNext

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरातील दैनंदिन वाहतूकव्यवस्था पूर्णपणे बेशिस्त झाली असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परिणामी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पण, यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन दिसत नाही, अशी परिस्थिती आहे.

पुण्यातून आपल्या चारचाकी वाहनातून उरुळी कांचनला येण्यासाठी निघालेल्या नागरिकांना सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी केवळ २९ किलोमीटर प्रवासाला लागत होते. वाहतूककोंडीमुळे जनतेला आपला वेळ, पैसा व इंधन वाया घालवावे लागत असल्याची भावना व्यक्त होत होती. जी तºहा महामार्गावरील वाहतूककोंडीची, तीच गावातील वाहतुकीची झाली आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई- पुणे- दौंड- सोलापूर- हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वेगाड्या उरुळी कांचनमधून जाणाºया लोहमार्गाने जातात. अशा प्रकारे दोन महत्त्वाच्या दळणवळण मार्गांच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत. यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व झपाट्याने वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी वाढलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांच्या वापराच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत. या कोंडीतून रुग्णवाहिकाही सुटत नाहीत. याला पर्याय देणे व शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील चारचाकी व अन्य वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीने व अस्ताव्यस्त पार्किंगने पूर्णपणे विस्कळीत झालेली. रविवार हा येथील आठवडेबाजाराचा दिवस असतो. त्या दिवशी तर बाहेर पडावे की नाही, अशी वाहतूककोंडीची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसते.

लांबच्या प्रवासाला निघालेल्या वाहनांना तासन् तास एका जागेवर उभे राहावे लागते.
डिझेल-पेट्रोलची अकारण नासाडी, मोठ्या प्रमाणात प्रदूषणवाढ
वाहतुकीचा भार पेलण्यासाठी रस्ते अकार्यक्षम
दोन चाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग बेशिस्तपणे

Web Title: Uruli Kanchanla is the traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.