सुप्यातील उरूस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:07 AM2021-06-27T04:07:58+5:302021-06-27T04:07:58+5:30
येथील शाहमन्सूर दर्गा सभामंडपात उरूसाविषयी विश्वस्त व ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. रविवार ( दि. २७ ...
येथील शाहमन्सूर दर्गा सभामंडपात उरूसाविषयी विश्वस्त व ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. रविवार ( दि. २७ ) ते बुधवार ( दि. ३० ) पर्यंत ग्रामदैवत व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा उरूस होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळे बंद असल्याने यंदाचा उरूस रद्द करण्यात आला आहे. त्यावेळी येथे धार्मिक विधी विश्वस्त, मानकरी, फकीर, धर्मगुरू व भाविकांच्या मोजक्याच उपस्थितीत प्रशासनाच्या आदेशानुसार पार पडणार असल्याची माहिती शाहमन्सूर दर्गा कमेटीचे चिफ ट्रस्टी युनूस कोतवाल यांनी दिली. याप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. शेख, पोलीस हवलदार भाऊसाहेब शेंडगे, पो.कॉ. के. व्ही. ताडगे, उपसरपंच मल्हारी खैरे, मा. सभापती शौकत कोतवाल, माजी उपसरपंच ज्योती जाधव, बी. के. हिरवे, दादा पाटील, युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे, अभिनव कुतवळ, संजय दरेकर, दर्गा कमेटीचे विश्वस्त अमीनुद्दीन मुजावर, समीर डफेदार, अयूब शेख व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.